अपॉइंटमेंट घ्या
विनंती पाठवल्यानंतर
- ती WhatsApp वरही पाठवा
- वेळ निश्चित करण्यासाठी आम्ही फोन करतो
- रिपोर्ट असेल तर WhatsApp वर पाठवा
- दिलेल्या वेळी रिपोर्ट घेऊन या
लगेच हॉस्पिटलला जा
भेटीची वाट पाहू नका, जर:
- दुखण्यासोबत ताप, थंडी किंवा हुडहुडी असेल
- डोळे किंवा त्वचा पिवळी, लघवी चहासारखी झाली असेल
- उलट्या थांबत नसतील
- लघवी होत नसेल, किंवा थेंब थेंब होत असेल
- लघवीतून खूप रक्त जात असेल
- इतके दुखत असेल की बसता किंवा उभे राहता येत नाही
प्रश्न
अपॉइंटमेंट किती लवकर मिळते?
पुढच्या ३० दिवसांतला कोणताही दिवस निवडा. वेळ निश्चित करण्यासाठी आम्ही फोन करतो.
अपॉइंटमेंट बदलता येते का?
हो. 77988 79979 वर फोन किंवा WhatsApp करा.
अपॉइंटमेंट घेताना पैसे द्यावे लागतात का?
नाही. फी ₹३००, क्लिनिकमध्ये द्यायची.
अपॉइंटमेंटशिवाय आलो तर चालेल का?
आधी अपॉइंटमेंट घ्या, म्हणजे थांबावे लागणार नाही.
माझा नंबर खाजगी राहतो का?
हो. तो फक्त अपॉइंटमेंटसाठी वापरतो आणि एका वर्षात पुसतो. लवकर पुसायचे असेल तर गोपनीयता पान पाहा.
तातडीचे असेल तर?
१०८ ला फोन करा किंवा जवळच्या हॉस्पिटलला जा.
